भद्रावती शहरात डेंग्यू व मलेरिया
रोगाचे वाढते रुग्ण लक्षात घेता त्यावर आळा घालण्यासाठी नगर परिषद भद्रावती मार्फत प्रभाग निहाय निर्मुलन उपाययोजना व जनजागृती मोहीम हाती घेण्यात
आली असून आज दिनांक 04/09/2021 ला प्रभाग क्रमांक 12 मधील आंबेडकर वॉर्ड, भंगाराम वॉर्ड, शिवाजी नगर येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली .
दरम्यान न.प.भद्रावती मार्फत खालील उपाययोजना करण्यात आल्या –
रस्त्याच्या कडेला वाढलेल्या अनावश्यक वनस्पतींची छाटणी करून त्याची पुनश्च वाढ होऊ नये म्हणून तणनाशक फवारणी करण्यात आली,उघड्यावर साचलेल्या पाण्या मध्ये तथा नाल्यांमध्ये डास नाशक फवारणी करण्यात आली , सकाळी ७ ते १० फॉगिंग करण्यात
आली, रस्त्याचा कडेला तथा खाली प्लॉटवर टाकलेला कचरा उचलून तेथे डस्टिंग पावडर टाकण्यात आले,
आशा वर्कर्स यांचे मार्फत घरोघरी जाऊन लक्षणे असलेल्या नागरिकांची विचारपूस करण्यात आली, तसेच न.प.भद्रावती अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य,मुख्याधिकारी,अधिकारी,कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी यांचे मार्फत नागरिकांशी थेट संवाद साधुन डेंग्यू तथा मलेरिया रोगाची गंभीरता, लक्षणे ,
उपाययोजना याबाबत माहिती देण्यात आली. लाउडस्पीकर , बॅनर व पोस्टर्स द्वारे डेंग्यू तथा मलेरिया रोगाची गंभीरता, लक्षणे , उपाययोजना याबाबत जनजागृती करण्यात आली.
मोहिमेदरम्यान नगर परिषद भद्रावती चे नगराध्यक्ष मा. श्री अनिलजी धानोरकर, उपाध्यक्ष मा. श्री संतोषजी आमने मुख्याधिकारी मा. श्री सूर्यकांतजी पिदूरकर, नगरसेवक, अधिकारी,कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी यांचा सहभाग होता ,या व्यतिरिक्त प्रभाग क्र. 12 मधील रहिवासी यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला.
सदर मोहीम प्रत्येक प्रभागात राबविण्यात येणार असून स्थानिकांनी उत्स्फूर्तपणे त्यामध्ये सहभाग नोंदवून आपला परिसर स्वच्छ करण्यास हातभार लावावा अशी न.प.भद्रावती मार्फत विनंती करण्यात येत आहे .
तसेच नागरिकांना “वसुंधरा शपथ” देऊन कार्यमाची सांगता करण्यात आली