
प्रतिनिधी :- धनराज खर्चान
अमरावती :-ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याच्या मागणीसाठी भाजपा अमरावती शहर जिल्ह्याच्या वतीने राजकमल चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. मागणीच्या समर्थनात घोषणाही देण्यात आल्या.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. जो पर्यंत ओबीसींना आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणूका घेऊ नका, अशी भूमिका भाजपाने घेतली आहे.
आपल्या या भूमिकेला अधिक बळ प्राप्त करून देण्यासाठी भाजपा राज्यभर निदर्शने करून ओबीसींचा आवाज बुलंद करीत आहे.
त्याच अनुषंगाने शुक्रवारी राजकमल चौकात निदर्शने करण्यात आली. ओबीसींना त्यांच्या हक्काचे राजकीय आरक्षण तातडीने लागू करावे, राज्य सकारने त्यासाठी धोरणात्मक पुढाकार घ्यावा, अशी आग्रही मागणी करून घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष किरण पातुरकर, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष विवेक चुटके, महापौर चेतन गांवडे, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, सभागृह नेता तुषार भारतीय, प्रा. रवींद्र खांडेकर, जयंत डेहनकर, उपमहापौर कुसूम साहू,
मंगेश खोंडे, राजेश आखेगांवकर, दिपक पोहेकर, राजु कुरील, कुणाल टिकले, सुरेखा लुंगारे, लविना हर्षे, पद्मजा कौंडण्य, संगीताबुरंगे, शिल्पापाचघरे, राधा कुरील,
गंगा खारकर, राजेंद्र मेटे, सुनील काळे, राजु कुरील, रवीकिरण वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर होते.