प्रतिनिधी :- धनराज खर्चान
अमरावती:- भातकुली अंतर्गत येत असलेल्या अळणगांव येथील तीन युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत वलगांव संत गाडगे बाबा वृद्धाश्रम येथील महिला व पुरुषांना आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून केळी व बिस्किटाचे वाटप केले.
त्या तरुणांचे नाव अभिजित रोकडे, इमरान शाह, व वैभव कारंजकर असे आहे.समाजाला काहीतरी देणे आहे ही बाब त्याच्या मनात घर करून बसली होती
त्यांनी हे ठरविलं कि या पेक्षा चांगली वेळ नाही आपण आपल्या वाढदिवसाचा वायफळ पैसे खर्च न करता या पैश्यामधून जर कोणच्या पोटाला अन्न भेटलं तर मग वृद्धाश्रम मध्ये काहीतरी दिले पाहिजे.आणि त्यानी सामाजीक उपक्रम राबविला आणि समाजासमोर एक आर्दश ठेवला.
इतर युवकांनी सुद्धा अशाच प्रकारचे उपक्रम राबविले तर अनाथ आश्रम तसेच वृद्धाश्रमांना खूप मोठी मदत होईल असे त्यांचे मत आहे. भातकुली तालुक्यातून त्या तीन युवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.