पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 

चंद्रपूर, दि. 3 सप्टेंबर : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

 

शनिवार दि. 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह ब्रम्हपूरी येथे आगमन व राखीव. सकाळी 11.15 वाजता सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती,

 

सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह परिसरात शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारत बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 12.30 वाजता नगर परिषद कार्यालय ब्रम्हपूरी येथे स्थानिक विकास निधी अंतर्गत प्राप्त रुग्णवाहिका व स्वर्गरथाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, दुपारी 1 ते 1.30 राखीव.

 

 

दुपारी 2 वाजता मालडोंगरी येथे आगमन व मालडोंगरी – चौगान – जुगनाका – मुई – गांगलवाडी – वायगाव – गोगाव – सायंगाव रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 2.45 वाजता पारडगाव येथे आगमन व गावातील अंतर्गत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती,

 

दुपारी 3.30 वाजता रणमोचन येथे आगमन व रणमोचन रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 4 वाजता रुई येथे वाल्मीक परिसरातील सभागृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 4.30 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रम्हपूरी येथे आगमन व राखीव, सायंकाळी 5 वाजता अभ्यागतांची भेट व चर्चा त्यानंतर शासकीय विश्रामगृह ब्रम्हपूरी येथे चर्चा.

दि. 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10.45 वाजता ब्रम्हपूरीहून शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव, सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद येथील कन्नमवार सभागृह येथे शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 12.30 ते 1 राखीव, सायंकाळी 4 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.