अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत वाढली चुरस राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

 

प्रतिनिधी -: धनराज खर्चान

अमरावती:अमरावती जिल्ह्या मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले आहे.येत्या चार आक्टबर ला निवडून पार पडणार आहे.त्यामुळे आता सर्वच राजकिय पक्ष कामाला लागले असून महाविकास आघाडी मधील दोन मंत्री या निवडणुकीत आमने सामने येणार आहे.

 

काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर आणि प्रहारचे राज्यमंत्री बच्चू कडू हे देखील निवडणूकीच्या मैदानात उतरणार आहे.त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली आहे.आज राजमंत्री बच्चू कडू यांनी उमेदवारि अर्ज दाखल केला असून राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडकेही यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.