चवरे नगरात सार्वजनिक शौचालयाचा विद्युत पुरवठा कापला बिल थकित, नाल्यची सफाई, फवारणीची समस्या कायम विदर्भ लहुजी सेनेची महापालिका आयुक्तांकडे धाव.

 

 

प्रतिनिधी //- धनराज खर्चान

 

स्थानिक प्रभाग क्रमांक २० मधील चवरेनगर वस्तीत असलेल्या सार्वजनिक शौचालयाचा विद्युत पुरवठा बिल न भरल्याने खंडित करण्यात आला. तसेच नाल्यांची सफाई व डास नि्मृलन फवारणीची समस्या कायम आहे. या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात. अन्यथा चवरेनगरातील केरकचरा आयुक्तांच्या दालनात आणून टाकू असा इशारा विदर्भ लहुजी सेनेने आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे.

चवरेनगर ही २५ते ३०वर्षापूर्वी वसलेली गोरगरीब रहिवासींची वस्ती असल्याने महापालिकेने नागरिकांना सार्वजनिक शौचालय येथे बांधून दिले.

या शौचालयात वीजपुरवठा ही देण्यात आला आहे. परंतु महापालिकेने देयकांचा भरणा न केल्याने वीज वितरण कंपनीने येथील वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे रात्रीच्या वेळी शौचास जाणे कठीण झाले आहे. पावसामुळे सध्या साथीच्या आजाराची साथ सुरू आहे. परंतु चवरेनगरातील साफसफाई कडे महापालिकेनचे दुर्लक्ष झाले आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची नियमित

साफसफाई होत नसल्याने दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक शौचालयातील विजेच्या देयकाचा तातडीने भरणा करावा. नाल्याची सफाई व डास नि्मृलन फवारणी करावी, रमाई आवास योजनातील लाभार्थींचे रखडलेले धनादेश तातडीने वितरित करण्यात यावी. या मागणीचे निवेदन विदर्भ लहुजी सेनेच्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आकाश खडसे यांच्या नेतृत्वात परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्तांना दिले. निवेदन देणाऱ्यांमध्ये अमोल जोंधळे, गोपाल गवई, कृष्णा भोगे, अजय झोंबाडे,उमेश कानाने, सतीश वानखडे, गोलू स्वर्गे,उमेश डोंगरे, प्रशांत थोरात, सागर महाजन आदींचा समावेश होता