टिप्पर व दुचाकीच्या धडकेत एक जागीच ठार तर दोन गंभीर जख्मी कन्नमवारग्राम गावात पसरली शोककळा

 

धिरज कसारे – तालुका प्रतिनिधी कारंजा

कारंजा(घा)— आज गणेशाची स्थापना असल्याने सर्वत्र धावपळ होती, याच कामानिमित्त कन्नमवारग्राम गावातील वाजंत्री चे काम करणारे काही युवक आज दि ,31 बुधवार ला सकाळी 9 च्या सुमारास नागपूर ला जात असताना काजळी ते बांगडापूर वळण रस्त्यावर कोंढाली कडून बांगडापूर कडे भरधाव वेगात येत असलेल्या टिप्पर क्रमांक MH-05 /EL 1229 ने MH- 40 / BN 8374 दुचाकीला जोरदार धडक दिली यात दुचाकीवर जात असलेल्या तिघांपैकी गजानन श्रावण कोवे वय 19 वर्ष हा जागीच ठार झाला, तर राहुल मोतीराम नेहारे वय 22 वर्ष याच्या दोन्हीही पायावरून टिप्पर गेल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला नागपूर येथे मेडिकल मध्ये पाठविण्यात आले आहे, तर समीर कोवे वय 14 वर्ष हा किरकोळ जखमी झाला, अपघात होताच टिप्पर च्या चालकाने घटनास्थळावरून पळ काढला, कारंजा पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून त्यांनी पंचनामा केला व टिप्पर ताब्यात घेतला, ठाणेदार दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात प्रवीण चोरे पुढील तपास करत आहे