भोयर पवार समाज आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार व वृक्षारोपण सोहळा संपन्न

 

 

कारंजा (घा.):– भोयर पवार विद्यार्थी मंडळ आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रा. भगवानजी बन्नगरे अध्यक्ष भोयर पवार विद्यार्थी मंडळ, कार्यक्रमाचे उद्घाटक भगवानजी बुवाडे उपाध्यक्ष नगरपंचायत कारंजा, प्रमुख पाहुणे सौ सरिताताई गाखरे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद वर्धा, विशेष अतिथी मा.दुर्गाप्रसाद परमार,बिनीसिंग परमार, मा. इंजि.मुरलीधर टेंभरे अध्यक्ष राष्ट्रीय क्षत्रीय पवार महासभा, मा.कैलास परमार, रामनारायण परमार, अशोक परमार, महैसिंग परमार, हरिनारायण परमार, प्रल्हाद सिंग परमार यांची प्रमुख उपस्थिती होती.गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभामध्ये 210 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारामध्ये वर्ग दहावी, बारावी, पदविका, पदवी, मधील विद्यार्थ्यांचा समावेश होता. तसेच भोयर पवार समाजातील मान्यवर श्री हेमंतजी ढोले, रमेशराव पठाडे, अतुलराव टोपले, सूर्यभांजी ढोबळे, मा. डॉ. कविता चोपडे गाखरे,मा. डॉ. रोशनी युवराज कामडी,नेहा हेमराज डोबले यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कारंजा शहराचे नाव लौकिक करणारी भारतीय व्हऍलीबल ची खेळाडू रक्षा विनोद खेनवार हिचा सुद्धा सत्कार करण्यात आला.गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रा. बननगरे,लेखराम चोपडे,कविता चोपडे,दुर्गाप्रसाद परमार,डाँ.रोशनी कामडी, नेहा डोबले यांनी योग्य व मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. धनंजय मानमोडे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर हजारे व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पराडकर सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शंकरराव कालभूत, सुहास टोपले, राजू डोंगरे, बाबाराव मानमोडे, हेमंत बन्नगरे,विजय गाखरे, दिनेश ढोबाळे, भोयर पवार विद्यार्थी मंडळ, भोयर पवार महिला मंडळ, सल्लागार मंडळ यांनि यशस्वी आयोजन करण्यात आले सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांना व पालकांना भोजन व्यवस्था करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.