कारंजा तालुका प्रतिनिधी // धीरज कसारे
कारंजा(घा.)दि.३०अमरावती जिल्ह्यातील मुसळखेड येथील यशवंत माऊलीच्या जीवनावर आधारीत लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर असलेला यशवंत या मराठी चित्रपटात यशवंत माउलीची भुमिका साकारणारे प्रमुख कलाकार नितीन मनोहरे यांचा कारंजा घाडगे येथे कारंजा कला क्रिडा अकादमीतर्फे पुष्पगुच्छ,
शाल,श्रीफळ व ग्रामगिता देऊन सत्कार करण्यात आला.
यशवंत चित्रपटात शिक्षकांची भुमिका असलेले सहकलाकार
कारंजा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक कारंजा कला क्रिडा अकादमीचे अध्यक्ष विलास वानखडे यांचे निवास स्थानी नितीन मनोहरे यांनी भेट दिली असता त्यांचा सत्कार करण्यात आला.
माजी सभापती मेघराज चौधरी,कारंजा कला क्रिडा अकादमीचे अध्यक्ष विलास वानखडे,शनशाईन स्कूलचे संस्थापक प्रेम महिले,माॅडेलचे
प्रा.सतीश काळे,माजी
नगरसेवक संजय कदम,
नगरसेवक विशाल इंगळे,
तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.प्रदीप झुटी,सुधाकर बोबडे, सिध्दार्थ सोमकुंवर,गौरव सोमकुंवर, नागरी समस्या संघर्ष समितीचे विनोद चाफले,उमेश पाचपोहर,विभाकर ढोले,मनोज
वानखडे,अशोक नागले,भाकरे महाराज संस्थानचे कैलास अग्रवाल,शासकीय कंत्राटदार पुरुषोत्तम अग्रवाल,सोम मुदगल
,दृष्यम डान्स अकादमीचे दर्शन जाधव,रितेश लाड,जीटी फिटनेस कल्बचे गौरव ठोंबरे,
गजानन महाराज संस्थानचे उमेश पायघन,अजय कसर,
गुरुदेव सेवा मंडळाचे बालू टुले,ज्योती यावले,संदिप भांगे, जिव्हाळा फाउंडेशनचे संदेश आमटे,करण आमटे,विकी कातलाम,वसंत श्रीराव तसेच जयश्री वानखडे
,विजेन्द्र वानखडे,विशाखा वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्व उपस्थितांनी नितीन मनोहरे यांना पुष्पगुच्छ देत अभिनंदन करून चित्रपट व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी चित्रपटातील भुमिके बद्दल त्यांनी माहिती विषद केली.चित्रपटाचे कथालेखन अजय देशपांडे,दिग्दर्शन पियुष विजय यांनी केले असून मकरंद अनासपूरे,स्मिता तांबे,आदित्य
हळबे व इतर कलाकारांच्या भुमिका आहेत. छायाचित्रण राजा फडतरे,संकलन स्वप्निल जाधव,गाणी सतीश सावरकर,
पार्श्वसंगीत मोहित,संगीत नियोजन दिपक पुजारी
सहनिर्माते आशिष बंदे,
अरविंद साबळे,दयानंद जोवाणी,सुषमा देशपांडे आहेत.
३१ ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता यशवंत या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होत असल्याचे नितीन मनोहरे यांनी सांगितले.
आभार प्रदर्शन नगरसेवक विशाल इंगळे यांनी केले.