आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना सेवानिवृत्त शिक्षकांनी दिले निवेदन पेन्शन व प्रलंबित विषय तात्काळ सोडविन्याची केली मागणी

 

 

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी// इशांक दहागावकर

अहेरी:- जिल्हा परिषद सेवा निवृत्त शिक्षक संघटना शाखा अहेरीच्या वतीने आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना रविवार 28 आगष्ट रोजी विविध मागण्यांचे निवेदन देऊन ते तात्काळ सोडविन्याची विणवणी केले.
मागण्या प्रामुख्याने सातवा वेतन आयोगाचा पहिला, दूसरा, तीसरा हप्ता मिळावे, कुटुंब निवृत्त वेतन बिल मिळावे, अंशराशिकरणाचे हप्ते मिळावे, पेन्शन धारकांचे वेतन दरमहिन्याच्या एक तारखेला मिळावे, या महिन्याचे पेन्शन गणेश चतुर्थी पूर्वी व्हावे, पी.पी.ओ.अद्यावत करून मिळावे या मागणीचे निवेदन देऊन सेवा निवृत्त शिक्षक संघटनेचे शिष्टमंडळानी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याशी सविस्तर चर्चा केले. यावर आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी सकारात्मकता दाखवून मागण्या रास्त असून लवकरच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याशी प्रत्यक्षात भेट घेऊन मागण्या सोडविन्याचे प्रयत्न करण्यार असल्याचे आश्वासन दिले.
निवेदन देतांना शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष नानाजी जक्कोजवार, कार्याध्यक्ष मधुकर(बबलू)सडमेक, उपाध्यक्ष अशोक पूसालवार, सचिव शंकर अलोने, सहसचिव अशोक निकुरे, कोषाध्यक्ष व्यंकटेश मोतकुरवार, सुरेश दोंतूलवार, सल्लागार लक्ष्मीबाई कुळमेथे आदी उपस्थित होते.