वर्धा: श्री भरतभाई परमार हे ए.सी.सी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये सिनियर इंजिनिअर असुन दिनांक २५-०८-२०२२ रोजी मदनी रोडवर करंजी काजी जवळील टार्निंग पॉईंटवर क्रॉस बॅरियर होल्डिंगचे कामाची पाहणी करण्याकरिता गेले असता त्यांना ५२ नग क्रॉस बॅरियर हे कोणीतरी अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याचे दिसले. त्यावरून फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे ५२ नग क्रॉस बॅरियर कि. २८०८०/- रू. चा माल चोरी गेल्याबाबत रिपोर्ट दिल्यावरून पो.स्टे. सेवाग्राम येथे अप.क्र. ५०६/२०२२ कलम ३७९, ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत सुरु असतांना मुखबीरकडून माहिती मिळाली की, दोन ईसम हे मदनी रोडवर मोटारसायकलने वारंवार ये-जा करत असुन त्यांचे जवळ पोत्या मध्ये काही तरी संशईत मालमत्ता आहे. माहितीप्रमाणे सदर वर्णनाचे १) दयाल अनिल माहुरे, वय २१ वर्ष, रा. मोर्चापूर, ता. सेलु, जि वर्धा २) विधिसंघर्षित बालक हे मदनी रोडवर मिळून आले व त्यांचे जवळील पोत्याची पाहणी केली असता त्यामध्ये क्रॉस बॅरियर दिसून आले असता त्या बाबत त्यांना विचापूस केली असता सदर बॅरियर त्यांनी मदनी रोडवरवरील करंजी काजी जवळील टार्निंग पॉईंटवरून चोरल्याचे सांगितलेवरून होल्डिंगची पाहणी केली असता ५२ नग कमी आढळून आल्याने त्याची कस्सून चौकशी केली असता बाकी बॅरियर मदणी रोडवर नाल्या लगत झुडपात लपवून ठेवल्याचे सांगितल्यावरून १) क्रॉस बॅरियर ५२ नग प्रत्येकी ५४०/- रू. प्रमाणे एकूण २८,०८०/- रू. २) गुन्हा करण्याकरिता वापरलेली जुनी वापरती पॅशन प्रो मो.सा क्र एमएच-३२/टी-४५९९ कि. ३०,०००/- रू. ३) दोन २४ नंबर चे पाने कि. २००/- रू. (गुन्ह्यात वापरलेले) जु. कि ५८२८०/- रू. मुद्देमाल जप्त करून वर नमूद गुन्हा उघडकीस आणला.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात पो.नि. श्री संजय गायकवाड, स्था.गु.शा. वर्धा यांचे निर्देशाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, पोलीस अंमलदार संतोष दरगुडे, राजेश तिवसकर, संघसेन कांबळे, विकास अवचट, राकेश आष्टनकर यांनी केली.