चाकूने वार करून श्वानाची हत्या करणाऱ्या आरोपीला देवळी पोलिसांनी केले अटक

 

वर्धा- देवळी तालुक्यातील दोन दिवसांपूर्वी शहरात पोलीस स्टेशन पासुन अवध्या काही अंतरावर रात्रीच्या सुमारास एका माथेफिरू तरूणाने चाकूने वार करून एका श्वानाची हत्या केली सदर घटना चर्चेत आल्यावर देवळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तरूणाला नागपूर येथून अटक केली आहे अक्षय बळीराम मडावी वय 24 रा वार्ड क्रमांक 13 देवळी असे आरोपी तरूणाचे नाव आहे त्याने देवळी शहरातील दोन दिवसांपूर्वी ठाकरे मार्केट चौकात एका श्वानाच्या पोटावर चाकूने वार करीत हत्या केली होती हा धक्कादायक प्रकार एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला या घटनेचे फुटेच देवळी शहरात वायरल होताच देवळी पोलीस खडबडून जागे झाले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तिरूपती राणे यांनी दखल घेत दोन दिवसानंतर एका व्हिडिओ क्लिपव्दारे भांदवी 429 सहकलम 11 प्राण्यांना निर्दयतेची वागणूक प्रतिबंधक अधिनियम 1960 अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आरोपी अक्षय बळीराम मडावी याला अटक करण्यात आली पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गोकुळसिंग पाटील पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुमित कांबळे
गुन्हे अन्वेषण विभागाचे कुणाल हिवसे, अनिल तिवारी, उमेश गेडाम, गणेश वैद्य व पोलीस स्टेशन देवळी पुढील तपास करीत आहे