शिवसेना व संभाजी ब्रिगेड युतीचे आर्वीत जल्लोषात स्वागत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला केले माल्यार्पण, भरवीले एकदुसऱ्याला पेढे

आर्वी, दि.२७:- शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवजी ठाकरे व संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे यांनी शुक्रवारी (ता.२६) घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत घोषीत केलेल्या राजकीय युतीचे येथील शिवसेना व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन व एकदुसऱ्याला पेढे भरवून ढोलताश्यांच्या जल्लोषात जोरदार स्वागत केले.
प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार घेवून वाटचाल करणारी संभाजी ब्रिगेड व स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा घेवुन राजकीय वाटचाल करणारी शिवसेना या मध्यमातुन एकत्र आली असल्याने सर्वांमध्ये उत्साहाचे वातावर निर्माण झाले आहे. यामुळे हिंदुत्वाचे नाव पुढे करुन मनुवादी विचारसरणी समाजात पेरण्याचे काम करणाऱ्या, धर्मा धर्मात व जाती जाती मध्ये तेढ निर्माण करुन महाराष्ट्रावर राज्य करण्याची मनिषा बाळगणाऱ्या भाजपला चांगलाच दणका बसणार असल्याचे वक्तव्य संभाजी ब्रिगेडचे वर्धा जिल्हा अध्यक्ष प्रफुल क्षिरसागर व शिवसेनेचे वर्धा जिल्हा उपप्रमुख दशरथ जाधव यांनी केले व येत्या नगर परिषद, जिल्हापरिषद, पंचायत समिती, सहकार क्षेत्रातील निवडणुका एकत्रीतपणे लढण्याचा निर्धार केला.
यावेळी शिवसेनेचे आर्वी विधानसभा प्रमुख गुड्डु गावंडे, शहर संघटक मिलींद लंगडे, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख महेश चौधरी, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष रोहन हिवाळे, जिल्हा सचिव रवी घाडगे, पियूष रेवतकर, गणेश पंधराम ,नरेश निनावे, शुभम राजे, चेतन आत्राम, आकाश हिरेखन, निलेश घुगरे, वीर काठाने, शुभम गोसावी, पियुष मेन्द्रे, शिवसेनेचे विभाग प्रमुख सर्व्हेश देशपांडे, अजय अवथनकर, प्रकाश खांडेकर, महेश देवशोध, मनिष अरसड, धिरज लाडके, महेश कुंभारे, मानकर याशिवाय शिवसैनिक व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.