एकविरा ब्रिलियंट माईंड स्कूल तर्फे तान्हा पोळा साजरा

 

 

भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतामध्ये अहोरात्र मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत बैल हा देखील मेहनत करत असतो. पण वर्षातून एक दिवस असा असतो ज्या दिवशी बैलांची पूजा करीत त्यांना आराम दिला जातो तो दिवस म्हणजे बैलपोळा.. लहान मुलांना बैलाचे महत्त्व समजावे याकरिता तान्हा पोळा चे आयोजन करण्यात येते. अकोलातील नामवंत व शिक्षण क्षेत्रात अग्रेसर एकवीरा ब्रिलियंट माईंड स्कूल तर्फे तान्हा पोळा चे आयोजन करण्यात आले होते. बैल सजावट स्पर्धा, मातीपासून बैल तयार करणे, चित्र काढण्याची स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा इत्यादी विविध स्पर्धेचे आयोजन शाळेमध्ये करण्यात आले. शाळेचे प्राचार्य श्री सागर श्रीराव यांनी विद्यार्थ्यांना बैलपोळ्याचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी घरूनच सजवून आणलेल्या तान्ह्या बैलांचे पूजन शिक्षकांमार्फत करण्यात आले. अशा विविध प्रकारच्या गतिविधी आयोजनामुळे विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक व कलागुणांचा विकास होत आहे.