कारंजा पोलिसांची धडक वॉश आऊट मोहीम
ठाणेदार दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
तालुका प्रतिनिधी //धीरज कसारे
कारंजा:- पोळ्याच्या पाडव्याच्या साठी मोठ्या प्रमाणत गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर कारंजा पोलिसांनी वॉश आऊट मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणार मोहाचा सडवा नष्ट करण्यात आला आहे ही वॉश आऊट मोहीम ठाणेदार दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे कारंजा तालुक्यातील कारंजा, सिंधिवीहरी,नर्सिंगपूर भागातील जंगल परिसरत ही मोहीम राबविण्यात आली असून मोठ्या प्रमाणात दारू भट्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे पोळ्याच्या पाडव्याच्या निमित्ताने ही दारू ग्रामीण भागात वापरण्यात येणार असल्याची माहिती च्या आधारे कारंजा पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली आहे, ही कारवाई पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत गोहत्रे, प्रवीण चोरे, निलेश मुंडे , वैभव गावंडे, वाढवे यांनी ही कारवाई केली आहे