वर्धा: पोळा सण व गणेशोत्सव शांततेने पार पाडावा या करिता पोलीस विभागातर्फे दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली
पोलीस अधीक्षक वर्धा प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पोलीस स्टेशन आर्वी येथे आज दिनांक 26.08.2022 रोजी पोळा सण व दिनांक 31.8.2022 गणेशोत्सव आर्वी शहरांमध्ये व ग्रामीण भागात शांततेत पार पाडावा याकरिता सकाळी 11.00 वाजता छत्रपती शिवाजी चौक आर्वी येथील जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली रंगीत तालीम झाल्यावर आर्वी शहरातील मुख्य मार्गाने पथसंचलन करण्यात आले
कार्यक्रमांमध्ये पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर पोलीस उपनिरीक्षक हर्षल नगरकर, चंद्रकांत तावरे, वाल्मिक बांबर्डे, तीस पोलीस अमलदार पोलीस मुख्यालय वर्धा येथून प्रविण सातारकर अमलदार(D.I) असे हजर होते सपुंर्ण कार्यक्रम उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला