अहेरी: महागाव येथील संदीप साईनाथ आत्राम नामक व्यक्ती आपल्या वयक्तिक कामानिमित्त अहेरी येथे आले होते काम आटोपून आपल्या स्वगावी जात असताना अहेरी येथून एक किलोमीटर असलेल्या बुजगरावंपेठा या गावाजवळ संदीप आत्रामचे अपघात झाले त्या अपघातात ते गंभीर जखमी झाले.
ही बाब स्वराज्य फाउंडेशन कोत्तूर अहेरी येतील तिरुपती चल्लावार, संकेत कोंडरा, बाल्या भाऊ ओडेट्टीवर कार्यकर्त्यांना लोकांनकडुन कडताच ते घटनास्थळी क्षणांच पण विलंब नकरता पोहचले व रुग्णवाहिकाची वाट नबघता आपल्या स्वतःच्या दुचाकीने गंभीर जखमीं झालेल्या व्यक्तीला जिल्हा उपरूग्णालय अहेरी येथे नेऊन भरती केले व उपचाराला सुरुवात होत पर्यंत सोबत होते आणी माहिती त्यांचा पालकांनपर्यंत पोहचवण्यात आले.