कारंजा तालुका प्रतिनिधी// धिरज कसारे
कारंजा – आज दिनांक २३/०८/२०२२ रोज मंगळवार ला अण्णासाहेब गुंडेवार विद्यालयाच्या प्रांगणात माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने व स्थानिक नागरिकांच्या मार्फत शाळा हिरवीगार करण्याच्या संकल्पा अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांना शिस्त बद्ध पद्धतीने वृक्षारोपण करून शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले गृप करून प्रत्येक गृप एक-एक झाड जगवेल , अशी सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा केली .
यावेळी प्रमुख पाहुण्यानी व माजी विद्यार्थी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वृक्षारोपण हे आजच्या काळात अतिशय महत्त्वाचे आहे प्रत्येकाने आपल्या घराभोवती , शेतामध्ये , मौदानामध्ये एक झाड लावायला पाहिजे ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि सर्वानी आपले कर्तव्य समजून झाडे लावावे व ते जगवावे असे सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी ब्रिजमोहनजी टावरी , रमेशराव धंडाळे , मुख्याध्यापक रेवसकर सर , माजी विद्यार्थी लिना खवशी , धिरज कसारे ,विनायकराव वानखडे , भिसे मॅडम , सरोदे मॅडम ,उईके सर , जसुतकर सर , शेंडे सर , ढाले सर , अमोल रमधम , शिपाई नौशाद , परतेती तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते