एटापल्ली मुख्य नाल्यावर पायरी बनवून दया एटापल्ली नगरपंचायतीत मागणी

 

 

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधि/ इशांक दहागावकर

 

एटापल्ली: आज राजमुद्रा फाउंडेशन तर्फे नागरपंचयतीत एटापल्ली येथील मुख्य नाल्यावर पायरी बनवून देण्याकरिता मागणी केली आहे सदर निवेदनात अशे म्हटले आहे की

अनेक वर्षापासून एटापल्ली नाल्यावर गौरी विसर्जन, गणपती विसर्जन, दुर्गा माता विसर्जन, विश्वकर्मा विसर्जन असे अनेक विसर्जन होत असतात पण त्याठिकाणी जाताना पूर्ण चिखलाचे साम्राज्य असते यामुळे पाय घसरून पडल्याने हाथ पाय तुटण्याचे शक्यता नाकारता येत नाही. करीता निवेदनाची दखल घेऊन तात्काळ याठिकाणी पायरी बनवून देण्याची राजमुद्रा फाउंडेशन कडून नगर पंचायत एटापल्ली यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.यावेळी राजमुद्रा फाउंडेशन पदाधिकारी
अनिकेत मामीडवार,
मनिष डाली (उपाध्यक्ष रा. का एटापल्ली) लिक चापले, वाजीद शेख,शन मंडल, दिशांत वाघाडे
, प्रांजय दहागावकर
शुभम हलदार, दमत मेडीवार,आदित्य राऊत आदी उपस्थित होते