नव्याने पदभार स्विकारलेले जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची सेवाग्राम आश्रमास भेट

नव्याने पदभार स्विकारलेले जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम येथील आश्रमास भेट दिली. यावेळी तहसीलदार रमेश कोळपे यांच्यासह आश्रम प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

आश्रमातील प्रार्थनास्थळ, खादी कापड निर्मिती, सूत कताई, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी वापरलेले आणि सद्या आश्रमात असलेले बापूंचे साहित्य तसेच आश्रम परिसराची त्यांनी पाहणी केली. तेथील विविध भागांना भेट देवून माहिती घेतली.