वर्धा: दारूची अवैध रित्या वाहतुक करण्यावर पोलीस स्टेशन देवळी येथील प्रकटीकरण पथकाची दारूबंदी कायदयाअन्वये कार्यवाई चारचाकी मालवाहु व टु व्हीलर वाहनासह एकुण जु.कि. 8,98,000 रू चा माल देशी दारू साठा जप्त
दि. 22/8/22 रोजी चारचाकी माल वाहु वाहनाने व टू व्हीलर वाहनाने अवैध रीत्या देशी दारूचा माल भरून दारूबंदी असलेल्या वर्धा येथील देवळी पो.स्टे हदीत येत असल्याबाबत मुखबीरकडुन पोलिसांना खात्रीशीर माहीती मिळाल्याने देवळी हदीतील अडेगांव चौफलीवर सापळा रचुन नाकेबंदी केली असता एक बोलेरे पिकउप चारचाकी मालवाहु क एम.एच. 29 बी.ई 2607 व टुव्हीलर के एम. एच29 बी. क्यु 4907 हे संगणमताने देशी दारूचा वाहतुक करून घेवुन येत असल्याचे दिसुन आल्याने सदर दोन्ही वाहने चालकासह थांबवण्याचा ईशारा केला असता त्यांनी वाहन थांबवीले सदर मालवाहू वाहनात देशी दारूच्या 180 एम.एल. च्या 9 पेटया ज्या मध्ये 432 निपा कि. 43200रू टुव्हीलर क एम.एच29 बी. क्यु 4907 मध्ये देशी दारूची एक पेटी ज्या मध्ये 48 निपा कि. 4800रू चा माल, बोलेरे पिकउप चारचाकी मालवाहक एम.एच. 29 बी.ई 2607 कि. 8,00,000 रू. टुव्हीलर के एम.एच29 बी. क्यु 4907 कि. 50,000रू असा एकूण जु.कि. 8,98,000 रू चा माल जप्त करून आरोपी 1. तंतेज लक्ष्मणराव गायकवाड वय 34 वर्ष रा. पोटगव्हाण ता. कळंब जि. यवतमाळ 2. वैभव दिवकराव निखाडे वय 23 वर्ष रा. कळंब यांचे विरुद्ध अपक / 22 कलम 65 अ.ई. 77 अ मु.दा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाई मा. पोलीस अधिक्षक साहेब श्री प्रशांत होळकर मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री यशवंत साळुंखे, उप विभागीय पोलीस अधिक्षक श्री. गोकुळसींग पाटील यांचे मार्गदर्शनात ठाणेदार स.पो.नि. तिरूपती अशोक राणे व त्यांचे अधिनस्त डि.बि पथक मधील पो.हवा. कुणाल हिवसे, अनिल तिवारी उमेश गेडाम, ना. पोकों गणेश वैदय यांनी केली