माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंदोबस्तावरील बीडीएस पथकाची कारवाई
आर्वी– तळेगाव राष्ट्रीय महामार्गाने चक्क ट्रॅव्हल्समधुन गुरांची तस्करी करणाऱ्यांना माजी उपमुख्यत्री अजित पवार यांच्या बंदोबस्तावरील बॉम्ब शोध पथक (बीडीएस) यांनी ताब्यात घेतले त्या वाहनांमधून सर्व जनावरांची सुटका करून तळेगाव बजरंग दलाच्या मदतीने टाकरखेड येथील गोशाळेमध्ये रवानगी केली शनिवार वीस ऑगस्ट ला माजी उपमुख्यत्री अजित पवार यांच्या अमरावती दौऱ्यादरम्यान बंदोबस्तावर असलेले वर्धा येथील बीडीएस पथक कारंजा येथून तळेगावकडे जात होते दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील सारवाडी नजीकच्या पारडी फाट्याजवळ रोडच्याबाजुला मिनी ट्रॅव्हल्स क्रमांक M H. 06 Fk 0291 उभी होती बीडीएस पथकाला हे वाहन संशयित दिसुन आल्यामुळे त्यांनी वाहनाची पाहणी केली असता त्यात गाई कोंबुन भरलेल्या दिसुन आल्या यामध्ये एकुण चौदा गाई होत्या त्यापैकी बारा जिवंत व दोन मृत अवस्थेत आढळून आल्या ट्रॅव्हल्सवरील चालक वाहन घटनास्थळावरून पसार झाला होता सदरची माहिती बीडीएस पथकाने तळेगाव पोलीस स्टेशनला दिली तेळगाव पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा केला व ट्रॅव्हल्स ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जमा केली तसेच या गाईची टाकरखेड येथील गोशाळेत तळेगाव बजरंग दलाचे कार्यकर्त्यांच्या मदतीने पाठविण्यात आले गुरांची व ट्रॅव्हल्सची अंदाजे किंमत नऊ लाख चाळिस हजार रुपये होती फरार आरोपीविरुद्ध गुन्हा तळेगाव पोलीस स्टेशनात दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे पोलीस निरीक्षक आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पवन भांबूरकर परवेज खान मनोज आसोले सुधीर डांगे अमोल मानमोडे विजय उईके अमोल इंगोले व तेळगाव पोलीस स्टेशन करीत आहे