आर्वी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आंदोलन येत्या 24 तारखे पर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेचे तीन वर्षांपासून थकीत असलेलं अनुदान दया अन्यथा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पुतळा दहन करू असा इशारा निवेदनातुन दिला तर स्थानिक संजय नगर घरकुल वसाहती स्वच्छता, व मूलभूत सुविधा पुरवा, आर्वी शहरात फवारणी करा फॉगिंग करा अन्यथा कार्यालयात साप सोडू जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पोटफोडे संतापले, संपर्क प्रमुख सुबोध मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे प्रदेश संघटक अभिजित पाटील फाळके यांच्या निर्देशानुसार आज दिनांक 19/08/22 ला शोले स्टाईल पाण्याच्या टाकीवर चढून नागरिकांच्या समस्येकडे आंदोलनातुन ज्ञानकर्षण करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला व युवकांनी आर्वी शहरातील नवीन पाण्याच्या टाकीवर चढून, प्रधानमंत्री आवास योजनेचे तीन वर्षांपासून थकीत अनुदान मिळाले पाहिजे, संजय नगर घरकुल वसाहती राहणाऱ्या नागरिकांना राहत्या खोल्या नियमित झाल्या पाहिजे तसेच, मूलभूत सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, आर्वी शहरातील सर्व झोप्पड पट्या नियमित झाल्या पाहिजे, वाढती महागाई कमी झाली पाहिजे, तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे या साठी जोरदार घोषणा दिल्या, परिसर पूर्णपणे दनाणून सोडला आणि यावेळी समस्यांची दही हंडी फोडन्यात आली यावेळी पाण्याच्या टाकीवर दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात प्रज्ञा हुमणे रामबती कुमरे, माधुरी सपकाळ, रेखा वानखेडे, भारती पोटफोडे, प्रमिला हत्तीमारे, मंदा मसराम, कमलेश चिंधेकर, सिद्धार्थ कळंबे, बादल काळे, सिध्हू खान, सागर शेंद्रे, निदर्शने केलीत, यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकाना खाली उतरण्याची विनंती केली तसेच उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांच्या शब्दाला मान देत आंदोलन थांबवून मागण्याचे निवेदन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्र्यांना पाठवले असुन प्रतिलिपी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, संपर्क मंत्री प्राजक्त तनपुरे यांना पाठविली यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेचे शेकडो लाभार्थी, संजय नगर वसाहती तील नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थिती होते,