आर्वी तालुक्यातील शिरपूर येथे सागर उमेकर यांच्या गायीच्या गोठ्यामध्ये साप असल्याची माहिती गरुझेप बहुउद्देशीय संस्था चे तुषार साबळे व त्यांच्या सबोत असलेले सदस्य हरीश शेंडे,रोशन सुरजुसे यांनी घटनस्थळाला पाहणी करताच त्यांना ८ ते ९ फुटाचा अजगर आढळला. अजगराला सुखरूपपणे पकडुन वनविभाग आर्वी ला स्वाधीन करून, त्याला वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन जाधव यांच्या सह उपस्थित कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आला यावेळी वन कर्मचाऱ्यांनी सदर अजगर आला वनपरिक्षेत्रात सोडण्यात आला घटनास्थळी सर्व उपस्थित गरुड झेप संस्थेचे कार्यकर्ता अनिल माहुरे .तुषार साबळे ,रमण मेंढे ,रविंद्र शिंपिकर,मिलिंद मसराम, विक्की मसराम,हरीष शेंडे, रोशन सुरजुसे,रितीक वडणारे, रशीद खान,अभिषेक सोनपराते,शैलेश मसराम,यश पवार, दर्शन बोरखडे,अनिमेश लांडगे यांनी अजगर ला पकडण्याकरिता मदत केली