आईच्या खांद्यावर असलेल्या बाळाचि जीवति चोरणाऱ्या चोरास पोलिसांनी केले अटक

 

 

वर्धा: सौ. प्रणाली केतन महल्ले रा. किन्ही (मोही) ता. सेलू जि. वर्धा त्यांची 18 महीन्याचे मुलीला घेवुन आईसह भावाला राखी बांधण्याकामी टेकोडा येथे जाण्यासाठी वर्धा बस स्थानकावर आल्या होत्या वर्धा बस स्थानकावर बसची प्रतीक्षा करीत असता एका अनोळखी इसमाने त्याचे खांदयावर असलेल्या लहान मुलीच्या गळयात असलेली सोन्याची जिवती किंमत 5,000/- रू. ची तोडुन पसार झाल्याने प्रणाली महले यांनी तात्काळ वर्धा शहर पोलिस स्टेशन येथे धाव घेवुन घटनेची तक्रार नोंदविल्याने पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलिस स्टेशन वर्धा शहर येथील पो.उप निरीक्षक सुरेश दुर्गे सा. व गुन्हे शोध पथकाचे पो.हवा. संजय पंचभाई व त्यांचे पथकाने गुप्त बातमीदार यांचे कडुन प्राप्त झालेल्या माहीती वरून अक्षय उर्फ फ्रीझ सुनिल काळे वय 20 वर्ष रा. पारधी बेडा वायफड ह.मु. स्वागत कॉलनी वर्धा यास कच्ची लाईन वर्धा येथुन ताब्यात घेवुन जबरीने चोरून नेलेली सोन्याची जिवती किंमत 5,000/- रू. ची आरोपी कडुन जप्त करून अल्पावधीतच गुन्हा उघडकिस आणला. वर्धा जिल्हा पोलिस दला तर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे कि सध्दया सणा सुदीचे दिवस असल्याने बस स्थानक तसेच बाजारपेठेत गर्दि होत असुन गर्दिचे ठिकाणी जाताना आपले मौल्यवान दागीने पर्स बाबत सतर्क राहावे जेणे करून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही .
सदरची कार्यवाही मा. प्रशांत होळकर सा. अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकि सा. उप विभागीय पोलीस अधीकारी पियुश जगताप साहेब यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांचे निर्देशानुसार पोउपनि सुरेश दुर्गे पो.स्टे.वर्धा (शहर) च्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार संजय पंचभाई सुनिल मेंढे, शाम सलामे, सचिन पवार प्रशांत कांबळे, जिवन आडे यांनी केली.