कारंजा तालुका प्रतिनिधी धिरज कसारे
कारंजा – तालुक्यातील कारंजा ते माणिकवाडा या रोडवर सावडोह तालुका कारंजा गावाला लागून नदी आहे व या खडक नदीवरील पूल अतिशय कमी उंचीचा असून त्या पुलाची उंची वाढविण्यात यावी ही समस्या गेल्या तीस वर्षापासून आहे कारण पावसाळ्यात पाऊस आल्यानंतर या रोडवरील पाच ते सहा गावाचे विद्यार्थी शेतकरी गावकरी जनता तसेच कर्मचारी वर्ग तहसीलचे कारंजा ठिकाण असल्यामुळे संपर्क तुटतो त्यामुळे नदीचा पूर पुलावरील पाणी ओसंडून वाहत असते व तो तासंतास कमी होत नाही त्यामुळे जीवनाच्या दैनंदिन व्यवहारात विद्यार्थ्याच्या शाळेत जाण्याच्या अडचणी निर्माण होते व त्याचा विपरीत परिणाम दैनंदिन व्यवहारात पडतो शेतकरी शेतात गेल्यावर त्यांना सुद्धा तासन्तास नदीच्या पुलाचे पाणी कमी होण्याची वाट पाहावी लागते तसेच विद्यार्थ्यांना सुद्धा रात्रीचे दहा अकरा वाजेपर्यंत संपुर्ण बसेस त्या ठिकाणी उभ्या असतात कारंजा येथील शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचे असून त्याठिकाणी नर्सरी ते महाविद्यालय असून या ठिकाणी विद्यार्थी दररोज आवागमन करीत असतात त्यामुळे लोकांच्या सोयीसुविधा सुरू व्हाव्यात व लोकांचा त्रास कमी व्हावा तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होणार नाही
त्याचप्रमाणे पावसाच्या दिवसात आवडते माणिकवाडा रोडवर येणार्या गावांमध्ये दवाखान्याची सोय नसल्यामुळे औषधे उपचार करण्यासाठी कारंजा किंवा शहराच्या ठिकाणी वेळेवर जाता येत नाही त्यामुळे आजारी नागरिकांचा वेळेवर इलाज होत नाही
तसेच या मार्गावरील सावडोह खापरी बेलगाव सुंसुंद्रा माणिकवाडा मार्गे वरुड कडे हा मार्ग जात असून शेतकऱ्यांच्या भाजीपाला व मालाची विक्री वेळेवर होत नाही
या पुलांच्या बांधकामासाठी नारा सावरडोह बेलगाव सुसुंद्रा माणिकवाडा साहूर ग्रामपंचायतीने ठराव दिलेले आहे वारंवार शासनाला या पुलाच्या उंची विषयी पत्रव्यवहार केला. हा मार्ग वरुड ला जात असून शेतकऱ्यांचा भाजीपाला विक्रीसाठी मार्केटला जात असतात हा गंभीर प्रश्न अजून पर्यंत सुटलेला नाही याबाबतीत नुकतेच बेलगाव सावरडोह नारा माणिकवाडा सुसुंद्रा खापरी या गावातील नागरिकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना तहसीलदार च्या मार्फत निवेदन देण्यात आले
मात्र कोणतीच उपाययोजना झालेल्या नसल्यामुळे शेवटी शिवसेनेचे संदीप भिसे तसेच नागरिक व विद्यार्थी यांनी बुधवार ला सकाळी नऊ वाजेपासून एक वाजेपर्यंत हा रस्ता रोखून धरला त्यानंतर कारंजा येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता कुबडे यांनी आम्ही पाठपुरावा करणार आहोत असे आश्वासन दिले आणि रस्ता सुरळीत चालू झाला
यावेळी आंदोलन सुरू असताना देश प्रथम ह्या भान ठेवून व देशाविषयी प्रेम दाखवून सर्व विद्यार्थी , शिक्षक , कर्मचारी , शेतकरी , शेतमजूर यांनी देश प्रथम समजून ठिक ११ :०० वाजता राष्ट्रगीत घेण्यात आले या वरुन सर्वांच्या मनातील देशभक्ती दिसून आली
यावेळी संदीप भिसे. बाबाराव काळमेघ आशिष पांडे . सतीश सोनारे वाल्मीक ठाकरे प्रवीण गवड शरदराव कोरडे साहेबराव
धुर्वे र्गोवर्धन गाडरे वामन धुर्वे गोलू मोहिते भारत कोरडे नितीन भोने मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते