कारंजा तालुका प्रतिनिधी धिरज कसारे
कारंजा (घा) दि. ०६-०८-२०२२ ला सनशाईन स्कूल तर्फे करियर मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा भोयर पवार सभागृहात पार
पडला. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलाने झाली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत झाडे देउन करण्यात आले.
JEE व इतर स्पर्धापरिक्षा या विषयांशी अवगत करण्यासाठी वर्धा येथील नामवंत मा. स्वप्निल बिसानी यांनी १० /१२ च्या विदयार्थ्यांना व पालकांना वर्ग 5 ते 10 पर्यंत शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या परीक्षा या विद्यार्थ्यांना भविष्यासाठी फार मौल्यवान असल्यामुळे पालकांनी प्राधान्य द्यावे तसेच शिस्त हा यशाचा मौल्यवान असून ते अंगिकरावे असे आवाहन केले व प्रश्नोत्तरे दरम्यान योग्य मार्गदर्शन केले तसेच संस्थाध्यक्ष प्रेम महिले यांनी आपल्या मार्गदर्शनातून मुलांना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित केले त्यानंतर १० मध्ये ९०% पेक्षा जास्त गुण असणाऱ्या विदयार्थ्यांचे स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये राशी मोहिते, ओम विरुळकर, स्नेहल इंगळे, राधा टावरी, मानसी इंगळे, वैष्णवी घोडमारे,उतकर्षा शेंडे, अंशुल पोटे, तनुश्री रमधम,शाश्वती मोहिते,सार्थक ढोबळे, खुश राठी,यश पालीवाल, खुशी जैयस्वाल,कृतिका टावरी, तसेच शिष्यवृत्ती परिक्षेत प्रविण्य मिळाल्याबद्दल डिंपल बारंगे,वेदांत टोपले, कृष्णा जसाणी,यांचा सत्कार करण्यात आला तसेच जवाहर नवोदयसाठी निवड झालेल्या हर्षिका बन्नगरे हिचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख
पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव विजय ठाकरे, रश्मी धर्माधिकारी व मुख्याधापक श्री प्रेम महिले उपस्थित होते.
खुशी जैयस्वाल गुणवंत विद्यार्थीनी हिने आपल्या
मनोगतात सांगितले की भविष्यात स्पर्धा परीक्षा महत्त्वाच्या असून मला याच स्कूल ने मला प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक पवन ठाकरे यांनी तर प्रास्ताविक हेमंत बन्नगरे यांनी केले तर आभार संगीता चाफले यांनी मानले यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिकांनी सहकार्य केले.