बिहाडीतील बैलजोडी चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

 

कारंजा तालुका प्रतिनिधी धिरज कसारे

कारंजा – तालुक्यातील बिहाडी येथील शेतकऱ्याची सर्जा राज्याच्या बैलजोडी रात्रीला शेतातील गोठ्यात बांधून ठेवली असता,पहाटे शेतकरी शेतात गेल्यावर गोठयात पाहणी दरम्यान बैलजोडी दिसून आली नाही. या प्रकरणी शेतकऱ्यांने अज्ञात चोरट्याने बैलजोडी चोरून नेली असल्याची तक्रार कारंजा पोलिसात दाखल करण्यात आली.
सध्या शेतकऱ्यांचा शेतीच्या हंगामात शेतकऱ्याला मदतीला असणारा मित्र म्हणजे बैलजोडी हीच बैलजोडी चोरीला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला. शेतीचे कामे खोळंबले. शेतकऱ्याचं कर्ताधरता बैलजोडी चोरी गेल्याने शेतकरी अपंग झाला. शेतकऱ्याची बैलजोडी मिळण्यासाठी शेतकऱ्याने अनेक गावांत पाहणी केली मात्र बैलजोडी आढळून आली नाही. कारंजा पोलिसांनी या प्रकरणात 7 जनाला अटक करण्यात आली.यात कारंजा येथील अजय उर्फ छोटू शांताराम चरडे , त्याचा मित्र कामडी या दोघांनी बैलजोडी चोरून आणून निखिल चिंधु वरठी वय 23 रा. साई नगर वडधामणा ,गुणवंता सदाशिव चरडे वय 45 , राकेश गुणवंत चरडे वय 21 रा. पारडसिंगा, मोहम्मद साहेल आसिफ खान वय 22, इरफान कुरेशी प्यारे कुरेशी वय 33 रा.अनसान नगर मोहमीनपुरा नागपूर यांना कारंजा पोलिसांनी ताब्यात घेतले.या प्रकरणी चौकशी केली असता बिहाडी येथील बैलजोडी चोरी केल्याची कबुली दिली यात एक बैलाची कत्तल करण्यात आली तर एक बैल मिळून आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद वानखडे,गुड्डू थुल, निखिल फुटाणे ,उमेश खामनकर यांनी केली.

बैलजोडी चोरीच्या इतर घटना उघडकीस शक्यता

तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या बैलजोडी, गायी ,म्हैस चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहे.अनेक वर्षपासून जनावरे चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे.यात नारा,वाघोडा, तरोडा यासह इतर गावातील जनावरे चोरीला गेल्या आहे.बिहाडी येथील बैलजोडी प्रकरणात 7 जनाला ताब्यात घेतले असून इतर घटना आता उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शहरातीलच जनावरे चोरी करणारा आरोपी असल्याने जनावरे चोरी जात असल्याची चर्चा शेतकरी करत आहे.