नागपंचमी निमित्त सर्पमित्रांची एकविरा ब्रिलियंट माईंड स्कूल ला भेट..

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नागपंचमीचे औचित्य साधून एकविरा ब्रिलियंट माईंड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वतः नागदेवता च्या मंदिराला जाऊन पूजा-अर्चना केली. अशातच सर्पमित्र सुजित देशमुख व अजय मांगुळकर यांनी नागपंचमीचे औचित्य साधून एकविरा ब्रिलियंट माईंड स्कूल ला भेट दिली. सर्पमित्राने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना आपल्या भोवतालच्या परिसरामध्ये आढळणाऱ्या जवळपास सर्वच सापांबद्दल माहिती दिली. सर्पमित्रांनी विद्यार्थ्यांना सापांचे छायाचित्र दाखवून त्याबद्दल माहिती दिली. प्राचार्य श्री सागर श्रीराव यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भोवतालच्या परिसरात साप दिसल्यास आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींना माहिती देण्याचे सांगितले. भविष्यामध्ये आपल्या परिसरामध्ये साप आढळल्यास त्यांना न मारता सर्पमित्रांसोबत संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य श्री सागर श्रीराव यांनी केले. शाळेमध्ये नेहमीच होत असलेल्या अशा गतिविधी मुळे शाळेची एक विशिष्ट छबी प्रस्थापित होत असताना दिसून येत आहे.