मोटर सायकल चोरी करणाऱ्या आरोपीस शहर पोलीसांनी केले गजाआड

 

वर्धा जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला

वर्धा: प्रशांत रामचंद्र भंडारे रा. रा. आकोली ता. सेलू जि. वर्धा हे शेती करतात दिनांक 01/08/2022 रोजी सकाळी 11/00 वा. वर्धा कोर्टात तारीख असल्याने गावातील मित्रासह आपली हिरो होंडा स्प्लेंडर प्रो मोटर सायकल क्रमांक एम.एच. 32 यु 2681 ने वर्धा कोर्टात आले व मोटर सायकल कोर्टाचे आवारा समोर रोडचे बाजुला लावुन होते कोर्टात गेले तीथे पुढील तारीख मिळाल्याने दुपारी 01/00 वा. दरम्यान परत आले असता गाडी लावलेल्या ठिकाणी दिसली नाही आजु बाजुला शोध घेवून ती मिळुन आली नाही कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याने त्यांनी घटनेची तक्रार पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे नोंदविल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता.

पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे तक्रार प्राप्त होताच गुन्हे शोध पथकाचे पो. हवा. संजय पंचभाई यांनी तपासाची चक्रे फिरवित गुप्त बातमीदार यांचे कडुन प्राप्त झालेल्या माहीती वरून राहुल लोभास धोटे वय 35 वर्षे रा. केजाजी चौक गोंड प्लॉट वर्धा यास इतवारा येथून ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन हिरो होंडा स्प्लेंडर प्रो मोटर सायकल क्रमांक एम.एच. 32 यु 2681 किंमत 40,000/- रू. ची जप्त करून अल्पावधीतच गुन्हा उघडकिस आणला.

सदरची कार्यवाही मा. प्रशांत होळकर सा. अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकि सा. उप विभागीय पोलीस अधीकारी पियुश जगताप साहेब यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांचे निर्देशानुसार पो.स्टे. च्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार संजय पंचभाई, सुनिल मेंढे, शाम सलामे, विशाल देवकते यांनी केली.