सनशाईन स्कूलद्वारे सर्पमित्र सत्कार व कार्यशाळेचे आयोजन नागपंचमीच्या निमित्ताने सर्पमित्रांचा सत्कार

 

कारंजा तालुका प्रतिनिधी धिरज कसारे

कारंजा – स्थानिक सनशाईन स्कुल, कारंजा द्वारा नागपंचमी चे निमित्याने पूर्वदिवसाला सर्पमित्र सत्कार व कार्यशाळाचे आयोजन भगवानजी बोवाडे, उपाध्यक्ष, न. पं. कारंजा यांचे अध्यक्षतेखाली व प्रमुख अतिथी कमलेश कठाणे, नगरसेवक, वॉर्ड क्र. 10, न. पं. कारंजा तथा प्रमुख मार्गदर्शक मनीष ठाकरे, गरुडझेप प्राणी मित्र संघटना अध्यक्ष, आर्वी यांचे उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले. प्रास्तविक मध्ये संस्थाध्यक्ष प्रेम महिले यांनी सर्पमित्र करीत असलेल्या कार्याची माहिती दिली व त्यांच्या कार्याचे कौतूक केले तसेच अध्यक्षीय भाषणात भगवानजी बोवाडे यांनी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकासोबतच सापांविषयी माहिती देण्यासाठी आयोजित कार्यशाळेचे अभिनंदन केले व ईतर उत्कृष्ट विद्यार्थी यांना कल्पक बनविण्याच्या दृष्टिने करीत असलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे म्हटले या प्रसंगी मनीष ठाकरे व सत्कारमूर्ती मुख्तार शेख यांनी सर्प जनजागृती अभियान राबवण्यात आले या मधे सापांबद्दल असलेले वेगवेगळ्या दंत कथा यावर विद्यार्थ्यांना संबोधित करण्यात आले असून सापांच्या जाती,सापांचा वावर,सापांचे जीवन मान, सपांमधे असलेले विषांचे प्रकार, साप चावल्या नंतर घ्यावयाची काळजी व साप हा निसर्गाचे समतोल राखण्यास किती मदत करतो व तो वाचवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी यावर सर्प मित्रांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी मोनु शेख,अंकुशजी कोठेकर,
आयुष सातपूरे, गणेश काळे व तन्मय कालभुत यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन शालिनी मोहोड व आभार हेमंत बंनगरे यांनी केले.
यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.