चंद्रपुर जिल्ह्यात सहा कोरोनामुक्त, चार कोरोनोबाधित ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 38

 

चंद्रपूर, दि. 26 ऑगस्ट : जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाची सुरुवात झाली तेव्हापासून तर आजपर्यंत एकूण 6 लाख 66 810 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून यापैकी 5 लाख 76 हजार 568 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. गत 24 तासात जिल्ह्यात सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच चार जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात गुरुवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

 

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 4 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 0, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 0, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 1, सावली 1, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 1, राजूरा 1, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 615 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 38 झाली आहे. सध्या 38 बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1539 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

 

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.