गडचिरोली जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आज नवीन कोरोना बाधित नाही तर 5 कोरोनामुक्त

 

गडचिरोली, (जिमाका) दि.23 : आज गडचिरोली जिल्हयात 225 कोरोना तपासण्यांपैकी एकही नवीन कोरोना बाधित आढळून आले नाही. तसेच आज 05 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30681 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29913 वर पोहचली. तसेच सद्या 22 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 746 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.50 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.07 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला.

आज नवीन बाधितांची संख्या निरंक आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या 05 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 02, अहेरी 00, आरमोरी 00, भामरागड 01, चामोर्शी 01, धानोरा 01, एटापल्ली 00, मुलचेरा 00, सिरोंचा 00, कोरची 00, कुरखेडा 00 तसेच वडसा येथील 00 जणांचा समावेश आहे.