आदिवासी संस्कृतीला जोपासण्यासाठी नव्या सामाजिक कराराची गरज जागतिक मूळनिवासी दिनानिमित्त सुरज कोडापे यांचे प्रतिपादन.


गडचिरोली

संयुक्त राष्ट्रसंघाने २०२१ ची जागतिक आदिवासी दिवस ची थीम या वर्षीच्या जागतिक मूळनिवासी लोकांच्या आंतरराष्ट्रीय दिनासाठी ‘कोणालाही मागे न सोडणे: मूळनिवासी लोक आणि नवीन सामाजिक कराराची मागणी’ या विषयावर निर्णय घेतला आहे,या अनुषंगाने जगातील इतर सामाजिक घटकांना सामाजिक भान म्हणून आदिवासी घटकाला आपल्यात सामावून घेण्यासाठी आवाहन केलेले आहे,त्यामुळे आदिवासी समाजाला व त्यांच्या संस्कृतीला जोपासण्यासाठी इतर समाज घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सुरज कोडापे यांनी केले.
बळीराजा पॅलेस येथील संविधान सभागृहात जागतिक मूळनिवासी दिनाच्या औचीत्यावर प्रमुख वक्ते म्हणून सुरज कोडापे बोलत होते.

 

गडचिरोली शहरात बळीराजा पॅलेस येथील संविधान सभागृहात जागतिक मूळनिवासी दिनाच्या औचीत्यावर प्रमुख वक्ते म्हणून सुरज कोडापे बोलत होते.यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नूतन मेश्राम ह्या तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. डोहने,गौतम मेश्राम,देवानंद फुलझेले उपस्थित होते.

 

भारतासह जगातील ७० देशात आदिवासी समुदाय पसरलेला आहे मात्र तो एकसंध नाही त्यामुळे इतर समाजाप्रमाने त्यांचा आधुनिक विकास झालेला नाही.भारतासारख्या राष्ट्रात आदिवासींचा विभागलेपणाचा फायदा घेऊन त्यांना फक्त वोटबँक बनविली जात आहे मात्र आदिवासींचे हक्क व मूलभूत अधिकार देखील त्यांना दिले जात नाहीत.

जिल्ह्यात अनु.जमाती साठी तिन्ही मतदारसंघात जागा राखीव असताना गेल्या ७४ वर्षात जिल्ह्यातील आदिवासी जनतेचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही उलट जिल्ह्यातील आदिवासी समाजासाठी आलेला विशेष विकास निधी वापरलाच जात नाही त्यामुळे एकूणच लोकप्रतिनिधी व लोकप्रशासन यांच्या उदासीन धोरणामुळे आदिवासींना मूलभूत व पायाभूत सुविधांबरोबरच मानवी हक्कांपासून वंचित राहावे लागत आहे.

कार्यक्रमाचे संचालन देवेंद्र सोनपिपरे यांनी केले व कार्यक्रमाचे आयोजक संतोष सुरडकर यांनी आभार मानले.