राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा बल्लारपूर द्वारा 6 वा वर्धापन तथा मन्डल दिवस साजरा

 

चंद्रपुर( राजु वानखेडे: उपसंपादक)

राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा बल्लारपूर द्वारा 6 वा वर्धापन तथा मन्डल दिवस दिनांक: 07/08/2021 रोजी जनता विद्यालय( सिटी ब्रांच) बल्लारपूर येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. गणपती मोरे, तालुका अध्यक्ष, हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. योगेश पोतराजे, सरपंच नवी दहेली, श्री. सुर्यकांत साळवे, शहर अध्यक्ष, श्री. राजु निखाडे, तालुका सचिव तसेच प्रमुख उपस्थिती श्री. बी. बी. भगत, मुख्याध्यापक जनता हायस्कूल ( डेपो शाखा ) बल्लारपूर , श्री. बंडू लान्डे, मुख्याध्यापक जनता विद्यालय साखरवाही, सौ. शेख मॅडम, मुख्याध्यापिका जनता विद्यालय( सीटी ब्रांच) बल्लारपूर, श्री. घनश्याम जुआरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, श्री. गंगाधर खिरटकर सहाय्यक शिक्षक, श्री. भाऊराव उपरे, श्री. सुधीर कोरडे, श्री. नरेंद्र इटनकर यांची होती.
प्रथमता: स्व. वी. पी सिंग माजी पंतप्रधान भारत सरकार व स्व. बी. पी. मन्डल माजी मुख्यमंत्री बिहार यांचे फोटोला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुजन करून माल्यार्पण करण्यात आले. श्री. लान्डे सर, श्री. इटनकर, श्री. भगत सर, सौ. शेख मॅडम यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षिय भाषण श्री. गणपती मोरे यांनी केले.
प्रास्ताविक श्री. राजु निखाडे, संचालन श्री. प्रकाश उरकुंडे, आभार श्री. महेश पानघाटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. पंकज मत्ते, श्री.
संदीप गौरकार, श्री. देवीदास कुबडे सहित जनता हायस्कूल( डेपो शाखा) व सिटी ब्रांच बल्लारपूर येथील कर्मचारी व ओबीसी नागरिकांचा सहयोग लाभला.