बल्लारपूर येथील वर्धा नदीमधे अनोळखी व्यक्तीचे प्रेत आढळले

 

चंद्रपुर( राजु वानखेडे: उपसंपादक)

बल्लारपूर शहरातील वर्धा नदीच्या संपवेल येथे एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत आढळून आले आहे. सूत्राच्या माहिती नुसार आज दुपारी 12:00 च्या दरम्यान वर्धा नदीत प्रेत तरंगत असल्याची सूचना बल्लारपूर पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व तपास सुरू केला सदर व्यक्तीचे प्रेत अंदाजे 2 ते 3 दिवसानंतर आढळून आल्याची चर्चा सदर परिसरात होती. मात्र त्या व्यक्तीची ओळख पटविणे अवघड झाले आहे. सदर व्यक्तीला कुणी ओळखत असल्यास बल्लारपूर पोलीस स्थानकात संपर्क साधण्याचे आव्हान पोलिसांनी केले आहे व यासंबंधीचा पुढील तपास पोलीस करीत आहे.