बल्लारपूर शहरात स्वच्छता करून फॉगिंगची व्यवस्था करावी- आम आदमी पार्टी

 

चंद्रपुर( राजु वानखेडे: उपसंपादक)

आम आदमी पार्टी बल्लारपूर शहर अध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांच्या नेतृत्वाखाली दिनांक:- 02/08/2021 रोजी नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी विजय सरनाईक जी यांची भेट करुण निवेदन सादर करण्यात आले आणि चर्चेनंतर असे सांगितले गेले की पावसाळा चालू आहे बल्लारपूर शहरात.

 

अनेक नाले घाणीने भरलेले आहेत, शहरात अनेक ठिकाणी झाडेही रस्त्यांच्या कडेला वाढली आहेत, ज्यावर स्वच्छता कर्मचारी लक्ष देत नाहीत, ज्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढतो मछर-माशांच्या सातत्याने वाढ होत आहे. महिलांना सकाळी आणि संध्याकाळी घरात काम करताना खूप त्रास सहन करावा लागत आहे

 

आणि शहरातील नागरिक डेंगु आणि मलेरिया सारख्या प्राणघातक आजारांशी लढत आहेत, दिवसेंदिवस खाजगी आणि शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. डेंग्यूसारख्या आजारांमुळे अनेक तरुण आपले प्राण गमावत आहेत,

 

बल्लारपूर शहरातील कचरा आणि झुडपे साफ करुण स्वच्छ करा आणि संपूर्ण बल्लारपूर शहरात त्वरित फॉगिंग करा, शहरातील प्रत्येक नागरिकाचे जीव वाचविने आपली नैतिक जबाबदारी आहे आणि या जबाबदारी ने संपूर्ण बल्लारपूर शहरात त्वरित फॉगिंग करण्याची मागणी “आप” बल्लारपूर तर्फे करण्यात अले,

यावेळी निवेदन देताना शहराध्यक्ष – रविभाऊ पुप्पलवार, शहर उपाध्यक्ष – अफजल अली आणि राकेश वडसकर, शहर सचिव – पवन वायगडे, शहर कोषाध्यक्ष – आसिफ शेख, शहर कृषी आघाडी प्रमुख – सुदाकर गेडाम, युवक शहर सचिव – उमेश काकडे, समशेर सिंह चौहान, प्रशांत गद्दाला, कृष्णा मिश्रा, ज्योती बाबारे, मीना केशकर, रीता प्रसाद, दुर्गा शेंडे, सोनम लाहोर, शबाना शेख, रितिका धिंगन, सरोज खिच्ची, कृष्णा मिश्रा आणि इत्यादि क्रांतिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.