सामाजिक कार्यकर्ता श्री किशोर मोहूर्ले धावून गेले अज्ञात युवकाच्या प्राणा साठी

 

चंद्रपुर( राजु वानखेडे: उपसंपादक)

महाराणा प्रताप वॉर्ड, बल्लारपूर येथील नगरसेविका सौ जयश्री किशोर मोहूर्ले यांचे पती श्री किशोर नानाजी मोहूर्ले हे सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असतात आज दिनांक:04 -08-2021 ला दुपारच्या सुमारास महाराणा प्रताप वॉर्ड येथे युवक भरधाव गाडीने येत असताना त्याचा तोल सुटला व तो सरपटत आपल्या टूव्हीलर सोबत पडला व तो गंभीरपणे जखमी झाला.

दत्तमंदिर ते जयभीम चौक,या रस्त्या वर अंडर ग्राउंड विद्धूत तारेचे काम सुरू आहे. सदर रस्ता थोडफोड असल्या मुळे हा अपघात झाला.त्या युवकाच्या मदतीस श्री किशोर मोहूर्ले धावून नगरपरिषद,बल्लारपूर ची रुग्णवाहिका बोलावून त्याला श्री प्रभाकर मत्ते, श्री अजय रासेकर,दिलीप चौहान,व जय गहलोत यांच्या मदतीने तात्काळ ग्रामीण रुग्णालय,बल्लारपूर येथे नेण्यात आले.तेथील डॉक्टरानी प्राथमिक उपचार करून त्याला जिल्हा रुग्णालय,चंद्रपूर येथे रेफर केले आहे.श्री किशोर मोहूर्ले यांच्या सतर्कते मुळे एक मोठा अनर्थला होता होता आटोक्यास आला. सदर युवकाचे नाव नागेश कुंजाम (रा. कोर्टिमक्ता कळमना ता. बल्लारपूर जिल्हा: चंद्रपुर) असे आहे.