सेवानिवृत्त कर्मचा-र्यांना बल्लारपूर नगर परिषद नगराध्यक्षांच्या हस्ते भविष्य निर्वाह निधीच्या धनादेशाचे वाटप व कर्मचाऱ्यांचा सन्मान

 

चंद्रपुर( राजु वानखेडे: उपसंपादक)

 

दिनांक: 03/08/2021 रोजी बल्लारपूर नगरपरिषदच्या स्वच्छता विभागाचे सेवा निवृत्त कर्मचारी श्री. दिलिप काळबांधे व श्री. पुरूषोत्तम नागतुरे यांचा नगराध्यक्ष मा. हरीश शर्मा यांच्या हस्ते भेटवस्तु देऊन सन्मान करण्यात आला.

 

तसेच भविष्य निर्वाह निधी धनादेशाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी मा. हरीश शर्मा यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना भावी आयुष्याबद्दल सदिच्छा व्यक्त केल्या. तसेच जीवन चक्राचा गाढा हाकता हाकता मौलाचे काही क्षण कळत न कळत हिरावून जातात आणि सेवानिवृती ही याच हिरावून गेलेल्या क्षणांना जगण्याची संधी देते असे मत मांडले .

 

याप्रसंगी उप मुख्याधिकारी श्री. जयंत काटकर , स्वच्छता सभापती श्री. येलया दासारफ,व हंसाराणी आर्य, नविन येनुरकर हे उपस्थित होते.
संचालन व आभार प्रदर्शन कार्यालय अधिक्षक श्रीमती संगीता उमरे यांनी केले.