24 वर्षांनी मित्र-मैत्रिणी आले एकत्र मैत्री दिनाच्या अनुषंगाने माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा साजरा

चंद्रपुर( राजु वानखेडे: उपसंपादक)

कर्मवीर विद्यालय, येनबोडीच्या सन 1996- 97 बॅचच्या वर्ग दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा 1 आॅगस्ट 2021ला एन. डी. हॉटेल, चंद्रपूर येथे कोवीड नियमांचे पालन करून आयोजित करण्यात आले. एकी कडे कोरोनाच्या लाटेने अनेकांचे जवडच वेक्ती हिरावून गेले. अशातच हे जग कुठलं वेगळं रूप घेईल हे नाकारता येत नाही म्हणूनच मैत्री दिनाच्या अनुषंगाने सर्व मित्रांनी स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्याचे सुचविले त्यामुळे एक ऑगस्टला सर्व मित्र मैत्रिणी तब्बल 24 वर्षानंतर एकत्र आले स्नेहमिलन सोहळ्यात आलेल्या सर्व मित्र-मैत्रिणींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

सर्वांचा औपचारिक परिचय घेण्यात आला सर्वांनी आपापले अनुभव कथन केले. छोट्या छोट्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्या सर्व उपक्रमात सर्व मित्र मैत्रिणी आनंद घेतला. विवीध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले.भविष्यात आपण सर्व एकजूट राहूया तसेच सामाजिक बांधिलकी जोपासून आपल्या बॅचच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजाला दिशा देण्याचे प्रयत्न करूया असा संकल्प करण्यात आला.

उपस्थित सर्व मित्र-मैत्रिणींना मैत्री दिनानिमित्त भेट देऊन शुभेच्छा देण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन सौ कल्पना मोरे(पंचभाई), श्री सचिन पाटील यांनी केले तर संचालन श्री किशोर मोहूर्ले यांनी सांभाळले.या स्नेहमीलन सोहळ्यात विलास टोंगे, राकेश लांडे,भास्कर मोरे, साधना चांदेकर (माऊलीकर), निकिता कोटारे(येल्लोरे), योगेश डाहुले, आशा खेकरे(उपरे), शैला चापले(वांढरे) ,मीनाक्षी शिंदे (वानखेडे), मेघा डांगे (राऊत), ज्ञानेश्वर डांगे, संतोष इटनकर, राकेश लोहे, युवराज शेंडे,गोपाल मोहूर्ले,संतोष कावरे,धनंजय झाडे आदी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सम्पूर्ण छायाचित्र श्री गिरीश लोहे यांनी काढले तर आभार प्रदर्शन श्री गुणाकार जुमनाके यांनी केले.त्यानंतर वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.