शिवाजी- कस्तुरबा वार्ड चौ-रस्त्याला स्व-डॉ महेश पापडकर चौक नाव द्या – देसाईगंज समाजवादी पक्षाच्या वतीने प्रशासनाला निवेदन 

 

प्रतिनिधी / / प्रज्ञानंद धोंगडे

देसाईगंज : येथील नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि डॉक्टर स्व-डॉ महेश पापडकर यांनी आपल्या वैद्यकीय आणि राजकीय कार्यकाळात वैद्यकीय क्षेत्रात गोरगरीब लोकांना मोफत सेवा दिलेली आहें तसेच देसाईगंज नगर परिषदेचे नगराध्यक्ष असताना त्यांनी अनेक वीकासात्मक कामे केलेली आहें कोरोणा काळात त्यांचे निधन झाले ही हानी देसाईगंज नगर वासी कधीही विसरू शकणार नाही

 

त्यांचे वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रातील कामे बघून देसाईगंज शहरातील शिवाजी – कस्तुरबा वार्ड राम मंदिर समोरील चौ-रस्त्याला स्व-डॉ महेश पापडकर चौक असे नाव देण्यात यावे या प्रमुख मागणीचे निवेदन आज देसाईगंज समाजवादी पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी देसाईगंज आणि मा मुख्याधिकारी नगर परिषद देसाईगंज यांना देण्यात आले

 

निवेदन देताना समाजवादी पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष इलियास खान, देसाईगंज शहर अध्यक्ष नरेश वासनिक, तालुका सचिव प्रितम जणबंधू,तालुका उपाध्यक्ष दानिश सय्यद, तालुका प्रसिद्धी प्रमुख जीब्राइल शेख,देसाईगंज जुनिवड्सा वार्ड अध्यक्ष इमरान पठाण ,जवाहर वार्ड अध्यक्ष जावेद पठाण आदी उपस्थित होते