अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती प्रीत्यर्थ रुग्णांना फड़े वाटप कार्यक्रम संपन्न

 

विशेष प्रतिनिधी / / पूजा दब्बा

भामरागड : क्रान्तिवीर बिरसा मुंडा सार्वजनिक वाचनालय भामरागढ़ येथे दिनांक १ आगस्ट २०२१ ला साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०१ वि जयंती त्याचप्रमाणे सांज मल्टी एक्टिविटी डेवलपमेंट इंस्टिट्यूट एस्टर एरिया बिनगुंडा स्थित भामरागढ़ या सामाजिक सवयंसेवी संवस्थेचा १० वा वर्धापन दिन संस्थेद्वारा सुरु असलेल्या सार्वजनिक वचनालयात साजरा करण्यात आला .यावेडी भामरागढ़ येथील प्रतिष्ठित नागरिक अमिनाबी शेख, तुलसीराम सड़मेक , अनमोल चवरे , लक्ष्मी सड़मेक उपस्थित होते .या प्रीत्यर्थ सांज मल्टी एक्टिविटी डेवलपमेंट इंस्टिट्यूट या संस्थेद्वारा ग्रामीण रुग्णालय भामरागढ़ येथील भरती रुग्णांना अमिनाबी शेख यांच्या हस्ते रुग्णांना फड़े वाटप करण्यात आली. यावेडी ग्रामीण रुग्णालय भामरागढ़ येथील मुनमुन बाला व इतर कर्मचारी उपस्थित होते .यावेडीसांज मल्टी एक्टिविटी संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष कुमार रूपलाल मारोती गोंगले यांनी रुग्णांना लवकर बरे होण्याचा शुभेच्छा दिल्या व ग्रामीण रुग्णालय भामरागढ़ कर्मचारी व उपस्थितांचे आभार मानले