कारंजा तालुका प्रतिनिधी धिरज कसारे
कारंजा– तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी कारंजा तालुका शिवसैनिकांच्या व तालुक्यातील शेतकऱ्यांचा वतीने तहसीलदार मार्फत मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
कारंजा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा शेतात तलावा सारखी परिस्थिती निर्माण झालेली दिसून येत आहे. त्यामुळे त्वरित ओला दुष्काळ व नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी कारंजा तालुका संघटक संदिप भिसे व शेतकऱ्यांनी तहसीलदार मार्फत मा. मुख्यमंत्री साहेब यांना केली.
यावेळी मेघराज खवशी , वाल्मीक ठाकरे उपसरपंच काकडा , राहुल भिसे उपसरपंच तरोडा , गजू बोडखे , मनिष धांदे तसेच शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते