शासकीय आश्रमशाळेकरीता कंत्राटी पद्धतीवर शिक्षक पदासाठी अर्ज आमंत्रित

शासकीय आश्रमशाळेकरीता कंत्राटी पद्धतीवर शिक्षक पदासाठी अर्ज आमंत्रित

, दि. 26 जुलै : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर आणि चिमूर यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय आश्रमशाळेकरीता कंत्राटी संगणक शिक्षक/निर्देशक, कंत्राटी क्रीडा शिक्षक/ मार्गदर्शक व कंत्राटी कला (कार्यानुभव) शिक्षक पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज भरण्याची अंतिम मुदत 5 ऑगस्ट 2022 पर्यंत राहील.

कंत्राटी संगणक शिक्षक/निर्देशक, कंत्राटी क्रीडा शिक्षक/ मार्गदर्शक व कंत्राटी कला (कार्यानुभव) शिक्षक, चिमूर प्रकल्पासाठी अनुक्रमे 4 तर चंद्रपूर प्रकल्पासाठी अनुक्रमे 5 याप्रमाणे प्रत्येकी 9 पदे पात्र उमेदवारांमधून कंत्राटी पद्धतीने 11 महिन्याच्या करारावर किंवा शैक्षणिक सत्र संपेपर्यंत किंवा यापैकी कमी असलेल्या कालावधीकरीता भरण्यात येणार आहेत. संबंधित एकूण पदांपैकी 2 पदे ही महिलांकरिता राखीव राहील.

कंत्राटी संगणक शिक्षक/निर्देशक पदासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता बी.एस.सी (सी.एस/आयटी), बी.सी.ए किंवा बी.ई.कम्प्युटर,बी.टेक कम्प्युटर व तत्सम पदवी तसेच उच्चशिक्षित एम.सी.ए./एम.एस.सी इन कम्प्युटर/आयटी असणे अनिवार्य असून सदर पदाकरीता 11 महिन्याच्या कंत्राटी पद्धतीवर दरमहा एकत्रित मानधन रु. 20 हजार देय राहील.

कंत्राटी क्रीडा शिक्षक/ मार्गदर्शक पदासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता नामवंत खेळाडू, माजी सैनिक, स्वेच्छा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे व्यतिरिक्त असलेल्या उमेदवारांसाठी तसेच विशेष क्रीडा अहर्ता एन.आय.एस./बी.पी.एड./एम.पी.एड किंवा कोणत्याही मैदानी खेळाचे किमान विद्यापीठस्तरावर, राज्यस्तरावर व राष्ट्रीयस्तरावर प्रतिनिधित्व केलेला असावा. सदर पदाकरिता 11 महिन्याच्या कंत्राटी पद्धतीवर दरमहा एकत्रित मानधन रु.25 हजार देय राहील. तर, कंत्राटी कला(कार्यानुभव) शिक्षक पदासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता ए.टी.डी.(आर्ट टीचर डिप्लोमा) अनिवार्य असून सदर पदाकरिता 11 महिन्याच्या कंत्राटी पद्धतीवर दरमहा एकत्रित मानधन रु. 20 हजार देय राहील. सदर तीनही पदाकरिता वयोमर्यादा किमान वय 21 व कमाल 43 वर्ष असावे.

अर्ज करण्याची पद्धत, अर्जाचा नमुना, अटी व शर्ती तसेच इतर सविस्तर माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या Chanda.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध असून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर या कार्यालयात देखील उपलब्ध आहे, असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी कळविले आहे.