वर्धा जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला
वर्धा: सिद्धार्थ दमडुजी थुल, वय ५८ वर्ष, रा. करंजी (भोगे) हे त्याचे घरी असतांना दिनांक ०६-०७-२०२२ रोजी रात्री अंदाजे १०.३० वा. दरम्यान मौजा करंजी (भोगे) येथील माजी पोलीस पाटील धनराज बलवर यांनी फोनद्वारे पोलिसांना माहिती दिली की, त्यांचा भाऊ अरुणकुमार थुल याला कोणीतरी अज्ञात इसमांनी त्याचे डोक्यावर जबर मारहाण करून जिवानिशी ठार केले आहे. अशी माहिती दिल्याने फिर्यादी यांनी त्यांचा भाऊ अरुणकुमार थुल याचे घरी जावुन पाहीले असता, घराचा किचनचा दरवाजा उघडा दिसला व बेडरुमचा लाकड़ी दरवाजा तुटुन खाली पडलेला दिसला. फिर्यादी यांनी घराचे आतमध्ये जावुन पाहीले असता, फिर्यादीचा भाऊ अरुणकुमार थुल हे घरातील बेडरुमध्ये खाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले त्यांच्या डोक्याला जबर मारहाण झाल्याचे व डोक्याला गंभीर जखम असल्याचे दिसले त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत होते, बाजुला काचेच्या दारुच्या शिशीचे तुकडे व एक लाकडी दांडयाचा तुटलेला तुकडा बेडवर पडुन असल्याचे दिसले. कोणीतरी अज्ञात इसमांनी फिर्यादी यांचा भाऊ अरुणकुमार थुल याचे घरात प्रवेश करून व बेडरूमचा लाकडी दरवाजा तोडून कोणत्यातरी अज्ञात कारणामुळे त्याच्या डोक्यावर दारुची काचेची शिशी व लाकडी दांडयाने जबर मारहाण करुन जिवानिशी ठार केले. अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरुन पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे कलम अप.क्र. ३८६/२०२२ कलम ३०२, ४४९ भादंवि. अन्वये गुन्हा करण्यात आला.
पोलिसांनी सदर गुन्ह्याची तात्काळ दखल गुन्हे घेवून गुप्त बातमीदार नेमुन गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहिती प्रमाणे आरोपी नामे १) अजय सुनिल शेंडे, ३० वर्ष, २) रोशन सुनिल शेंडे, वय २८ वर्ष, रा. भैसारे ले-आउट, कामठवाडा, सेवाग्राम, ३) गौरव गोविंद कापटे, वय २५ वर्ष, रा. नागमंदिर जवळ, वरुड यास सेवाग्राम येथून अटक करून वर नमूद गुन्हा उघडकीस आणला.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा श्री पियुष जगताप यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री निलेश ब्राम्हणे, पोलीस स्टेशन सेवाग्राम याचे निर्देशाप्रमाणे पोउपनि राहुल ईटेकार, पोलीस अंमलदार हरिदास काकड, गजानन कठाणे, पवन झाडे, अभय ईंगळे नेमणुक पोलीस स्टेशन सेवाग्राम तसेच सायबर सेल यांनी केली.