एकविरा ब्रिलियंट माईंड स्कूल तर्फे कारगिल विजय दिवस साजरा

 

 

अकोला: संपूर्ण भारतामध्ये 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून अकोला मधील नामवंत एकविरा ब्रिलियंट माईंड स्कूल तर्फे विविध उपक्रम राबवून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. शाळेतर्फे संपूर्ण विद्यार्थ्यांना कारगिल विजय दिवसाचे महत्त्व समजून सांगण्यात आले. तसेच शाळेचे प्राचार्य सागर श्रीराव यांनी शाळेमध्ये विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना कला कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध करून दिली. शाळेतील सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी कारगिल मध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. शाळेतील विद्यार्थ्यांनी वीर जवानांचे व भारताचा राष्ट्रीय ध्वजाचे चित्र काढून आपल्या कला कौशल्याचे सादरीकरण करत कारगिल विजय दिवस साजरा केला. शाळेचे प्राचार्य श्री सागर श्रीराव यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण आज पहायला मिळाले. विविध उपक्रमांचे आयोजन करून अशा ऐतिहासिक दिवसाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून सांगण्याची ही कृती आज सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेली आहे.