उपमुख्यमंत्री यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून साजरा. भाजपा नगरसेवकांनतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

 

 

तालुका प्रतिनिधी // धीरज कसारे

कारंजा (घा)- महारष्ट्र राज्याचे यशस्वी माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसनिमित्त कारंजा नगर पंचायत चे गटनेता शिरिष भांगे, अर्थ व नियोजन सभापती योगिता कदम, शिक्षण व क्रीडा सभापती उषा चव्हाण, नगरसेविका रमा दुर्गे,वैशाली सरोदे, रंजना ढबाले, सुवर्णा कावडकर,नगरसेवक राहूल झोरे, हेमराज भांगे यांचे तर्फे प्राथमिक शाळा खर्डीपुरा, येथील विद्यार्थांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कारंजा शहरातील खर्डीपुरा येथील गरीब लोकवस्ती असलेल्या भागातील विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेतं असतात. देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून साजरा करण्याचे सर्व भाजपा नगरसेवक – नगरसेविका यांनी ठरविले व वर्ग १ ते ४ मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झालेला दिसत होता.
यावेळी प्रामुख्याने कारंजा नगर पंचायतचे गटनेते, सर्व भाजपा नगरसेवक – नगरसेविका तसेच शाळेचे केंद्रप्रमुख बारापात्रे सर, मुख्याध्यापक साठे सर, भोले मॅडम, शिक्षणतज्ञ महादेवराव कामडी सर, समाजसेवक रमेश भांगे, संजय कदम, किशोर भांगे, शेख निसार, सुधाकर दुर्गे, प्रमोद चौहाण, शहर अध्यक्ष दिलीप जसुतकर,गजानन सरोदे, प्रवीण ढबाले, अनिल वंजारी, दिनेश केवटे, अजय कावडकर,उपस्थित होते.