वर्धा / आर्वी देऊरवाडा मार्गावरील पाणंद रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था दिसून आली. या पावसामुळे गुडघाभर चिखलातून शेतकऱ्यांची वहिवाट सुरू आहे. परिसरातील तब्बल २२ शेतकऱ्यांनी शेतशिवार पेरले असून सर्वत्र पाणीच साचले आहे. या पिकांची काळजी घेण्याकरिता नियमित चिखल तुडवित जावे लागत आहे. या पाणंद रस्त्याच्या दुरुस्तीकरिता लोकप्रतिनिधी आणि अधिकारीही लक्ष देत नसल्याचे युवा शेतकरी राहुल बोरघडे व गावकरी
यांनी यावेळी सांगितले. पावसाळ्यात दरवर्षी हा त्रास देऊरवाडाच्या शेतकऱ्यांना
सहन करावा लागतो