कारंजा तालुका प्रतिनिधी धिरज कसारे
कारंजा:- कारंजा तालुक्यातील खैरावडा येथील लिलाबाई इंगळे यांच्या घरात पेव आढळला आहे मातीचे घर असल्याने पावसाने घरात ओलावा पसरला होता घरातील जमिनीला अचानक मोठा खड्डा पडल्याने लिलाबाई घाबरून गेल्या होत्या मातीच्या त्यांनी आरडाओरडा करून नागरिकांना जमा केले त्यांनतर लक्ष्यात आले की पुरातन काळात धान्य साठविण्यासाठी जमिनी मध्ये खोलगट आकाराचा गड्डा करून त्यामध्ये धान्य साठविण्यासाठी पेव तयार करण्यात येत होत्या तशीच लिलाबाई यांच्या घरात पेव आढळल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे खैरावडा गाव या गावात महापाषाण युगातील अनेक अवशेष गावाच्या आजूबाजूच्या परिसरात आढळल्या जाते या ठिकाणी अनेक ऐतिहासिक संशोधन करते गावात येऊन अभ्यास करत असतात अश्याच प्रकारे हे पेव सुद्धा पुरातत्व असल्याचे मत गावातील नागरिक नरेश तायडे यांनी व्यक्त केले आहे घरात अचानक जमिनीत पेव आढळल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे