बँक ऑफ बडोदा चा 115 वा वर्धापन दिन साजरा

 

आर्वी तालुका प्रतिनिधी// लखन दाभने

देशातील द्वितीय अग्रगण्य बँक ऑफ बडोदा चा दिनांक 20 जुलै 2022 रोजी 115 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

या वर्धापन दिनाची सुरुवात करताना शाखेमध्ये सर्वप्रथम बँक ऑफ बडोदा चे फाउंडर श्री सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी म्हणून बँक ऑफ बडोदा दरवर्षी वर्धापन दिनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते या शुभ दिनाचे औचित्य साधून या ही वर्षी बँक ऑफ बडोदा आर्वी शाखेद्वारे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते शाखेतच राबविण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला व तब्बल 40 लोकांनी रक्तदान केले.
या रक्तदानाच्या कार्यक्रमाबरोबर बँकेने त्यांचे दत्तक गाव दहेगाव मुस्तफा, दहेगाव तांडा व पाचेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना भेट वस्तूच्या स्वरूपात छत्री, पेन आणि खाऊ वाटप करून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी व त्यांच्या जडणघडणीसाठी उत्तम असे मार्गदर्शनही करण्यात आले.
संपूर्ण दिवसभर चाललेल्या या विविध कार्यक्रमास बँकेच्या ग्राहकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
संपूर्ण कार्यक्रम बँकेचे शाखाधिकारी श्री अमोल पंचभाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला तसेच या कार्यक्रमास जबाबदारीने पूर्ण करण्यास बँकेतील इतर कर्मचारी अमितकुमार फटे, भारत चौधरी, पियुष बोरकर, जीवन पवार, चेतन वनसकर, अतुल नागरे, लंकेश्वर नीनावे, विजय भोसले राहुल झळके, बँक प्रतिनिधी प्रमोद झांबरे आणि बाबा रावजी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाची सांगता करताना बँकेने प्रत्येकाचे आभार मानले. प्रामुख्याने फर्म निरंकार कोटेक्स, श्रीरामकृपा फायबर्स, ग्लोबल कोट्सपिन, सेवाग्राम एक्झिपीएंट्स, आणि आयुष ब्लड बँक नागपूर यांचेही सहकार्य लाभल्याचे बँकेने नमूद केले.